ग्रामपंचायत आंबेगण

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

नाशिक शहरापासून साधारण ३५ किलोमीटरवर नाशिक-पेठ रस्त्यावर असलेला आंबेगण हा एक छोटासा आदिवासी पाडा. मात्र, या पाड्याचे वैशिष्ट म्हणजे येथे राष्ट्रीय स्मारक हा दर्जा मिळालेले एक प्राचीन मंदिरही आहे. गावात पूर्वी आंब्याची खूप झाडे होती म्हणून गावाला आंबेगण म्हटले गेले असावे, असे तेथील ग्रामस्थ सांगतात. आंबेगणमधील प्राचीन मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून, येथील शिल्पकला आपल्याला मोहात पाडते. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. प्रवेशद्वार नक्षीकामाने सजलेले दिसते. मंडपाचे छत मात्र आता कोसळले आहे. आंबेगणचे हे महादेव मंदिर भूमीज शैलीतील असून, ते यादवांच्या काळात बांधले गेले असावे असे वाटते.

आंबेगण २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
पदनाम व्यक्ति
ग्रामपंचायत कार्यालय आरेघण स्थापन दिनांक: 13-03-1965, ता. दि. दिंडोरी, जि. नाशिक
कार्यकारी मंडळ सन 2022 ते 2027
श्री. सुरेश राधो वाघ लोकनिर्वाचित सरपंच
सौ. सोनाली संतोष लोखंडे उपसरपंच
श्री. जयराम पांढरंग गायडखेड सदस्य
श्री. पंढरिनाथ बामन पाटील सदस्य
सौ. सुमिता तुकाराम पाटील सदस्य
श्री. चंद्रकांत पंढरिनाथ कोतवाल सदस्य
सौ. रेखा भास्कर गायडखेड सदस्य
सौ. वृषाली सुनील कोतवाल सदस्य
श्री. शुभाश देविदास चारोकर सदस्य
सौ. मनीषा विकास गायडखेड सदस्य
श्री. प्रदीप सोमनाथ बेलंगे ग्राम. प. अधिकारी
सौ. संगीता जगदीश बागुल संगणक परिचालक
श्री. अब्दलास शंकर पाटील पा. पु. कर्मचारी
श्री. किलास अब्दलास पाटील शिपाई

लोकसंख्या माहिती (Population Data)
जनगणना पॅरामीटरजनगणना डेटा
एकूण लोकसंख्या१६५४
एकूण घरांची संख्या२९५
महिला लोकसंख्या %४८.३% (७९९)
एकूण साक्षरता दर %५२.९% (८७५)
महिला साक्षरता दर२२.१% (३६५)
अनुसूचित जमाती लोकसंख्या %८४.३% (१३९५)
अनुसूचित जाती लोकसंख्या %१३.०% (२१५)
कार्यरत लोकसंख्या %५६.७%
२०११ पर्यंत लोकसंख्या (० -६) बालके२५६
२०११ पर्यंत मुली (० -६) लोकसंख्या %४७.७% (१२२)

माझ्या गावा बद्दल (गावाची ओळख)
अ.क्रतपशिलमाहिती
वस्तीचे नावआंबेगण
गावाची ओळख कोणत्या खुणेवरुन आहेदमनगंगा नदीचा उगम
ग्रामपंचायतआंबेगण
गावाचा LGD कोड५५०५५४
तालुकादिंडोरी
गावात राहणा-या जमाती/समाजाचे नावकोकणा, कोळी महादेव, महार, मराठा , वारली.
गावाचा पुर्ण पत्तामु. पो. आंबेगण ता. दिंडोरी जि. नाशिक ४२२००३
अ) वस्तीतील धार्मीक ठिकाणे
ब) ग्रामस्थ वार्षिक पुजा सण
अ) प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर, मारुती मंदिर, दुर्गा माता मंदिर, सप्तशृंगी माता मंदिर, विठ्ठल मंदिर
ब) हनुमान यात्रा, बोहाडा, साप्ताह, यात्रा, माऊल्या

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी